मंचर प्रतिनिधी
आषाढी पौर्णिमेला(गुरु पौर्णिमा )धामणी (तालुका आंबेगांव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात स्वयंभू सप्तशिवलिंगाचा व खंडोबा.म्हाळसाई.व बाणाईच्या सर्वांगसुंदर मुखवट्यांचा रूद्राभिषेक व दुग्धाभिषेक व पुष्प (फूल) पूजा सोहळा उत्साहात बुधवारी( २९जुलै२६) साजरा झाला.आषाढी पौर्णिमेच्या (व्यास पौर्णिमा )पारंपारिक पूजेला फूल सोहळ्यासाठी मंदिराचे मुख्य गाभाऱ्यात
झेंडू.अष्टर. गुलाब व फळाचा वापर करण्यात आला. गाभार्यात सुगंधी फुलांची व फळांची आरास करण्यात आली होती. यामुळे मंदिर परिसर भक्तिने आणि सुगंधाने न्हाऊन निघाला होता.आषाढ महिण्यातील पौर्णिमेच्या मुहर्तावर बुधवारी शेकडो भाविकांनी “सदानंदाचा येळकोट,जय मल्हारच्या नामघोषात धामणी (तालुका आंबेगांव) येथील पुरातन श्री म्हाळसाकांत खंडोबाचे दर्शन घेतले. धामणीच्या पुरातन खंडोबा मंदिरात पौर्णिमेच्या पहाटे चार वाजता घंटानाद झाला. त्या नंतर शांताराम बाळासाहेब जाधव व सुजाता जाधव. सुचित जाधव व आशा जाधव. अतुल विधाटे व वैशाली विधाटे. गोरक्ष ताबे व गुफा ताबे.संदीप भुमकर व चिञा भुमकर. बाळासाहेब दगडू भुमकर व निता भुमकर. दिलीप आळेकर व शेवंता आळेकर. अविनाश बढेकर व सुजाता बढेकर. गणपत नारायण भुमकर व मंगल भुमकर. बाळासाहेब महादू बढेकर व उषा बढेकर. रमेश गणपत जाधव व मंगल जाधव. राजेंद्र हिवरकर व सुवर्णा हिवरकर. मयुर विधाटे व माधुरी विधाटे या १३जोडप्यांच्या हस्ते दुग्धाभिषेक व रुद्राभिषेक संपन्न झाला.
यावेळी खंडेराय. म्हाळसाई. बाणाई व जोगेश्वरीच्या देखण्या मूर्तीना वस्रालंकार व सुंगधी फुलांचे हार घालण्यात आल्यानंतर देवस्थानाचे सेवेकरी दादाभाऊ भगत.प्रभाकर भगत.सुभाष तांबे.शांताराम भगत.नामदेव भगत.राजेश भगत.राहूल भगत.अनिरुध्द वाळूंज. यांच्याकडून स्वयंभू सप्तशिवलिंग आणि पंचधातूच्या सर्वांगसुंदर देखण्या खंडोबा.म्हाळसाई व बाणाईच्या मुखवट्यावर सुवासिक केशर व सुंगधी दवण्याचे अत्तरमिश्रित केलेल्या गंधाचे लेपन करण्यात आले.त्यानंतर खंडेरायाला नैवेद्य दाखवण्यात येऊन शेकडो भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली.पौर्णिमेच्या अभिषेकाचे पौरोहित्य प्रमोद देखणे यांनी केले.
मंदिराच्या गाभार्यात झेंडू.गुलाब.अष्टरच्या फुलांची सजावट विआन भुमकर व अतुल विधाटे यांचे सौजन्याने केलेली होती.पहाटे मंदिरात स्वयंभू सप्तशिवलिंगाचा अभिषेक झाल्यानंतर उपस्थित भाविकांच्या कपाळाला भंडारा लावण्यात आला.आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. यावेळी भाविकाना प्रविण देखणे व ओम आळेकर यांच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था केलेली होती. आषाढ महिण्यातील पौर्णिमेच्या निमित्ताने पंचक्रोशीतील भाविक खंडोबाचे, दशनासाठी व तळी भंङार करण्यासाठी कुटुंबियासह आलेले दिसत होते.अधूनमधून तुरळक पावसाच्या सरी येत होत्या. चार चाकी. दुचाकीने भाविकांची ये जा सुरु होती. गुरु पौर्णिमेची कथा पुरातन कथेनुसार आदीयोगी भगवान शंकर हे जगाचे पहिले गुरु मानले जातात.
शंकर भगवान प्रदीर्घ काळ योग निद्रेत गेले होते. त्याच्याकडून ज्ञान प्राप्त करण्यासाठी सप्तषीनी हजारो वषै तप केले.अखेर आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकर प्रसन्न झाले.आणि त्यांनी ऋषीं व सप्तषीना योग. ध्यान. व आत्मज्ञान याचे दिव्य शिक्षण दिले.याच आषाढी पौर्णिमेच्या दिवसापासून गुरू पौर्णिमेचा प्रारंभ झाला असे मानले जाते. म्हणूनच हा दिवस गुरुस्मरणाचा दिवस म्हणून पवित्र मानला जातो. या दिवशी महषी व्यास पूजनाची परंपरा असल्याचे सांगण्यात आले.





