spot_img
spot_img
spot_img

वडगावपीर येथे गणपती-महादेव मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा गुळवे वस्तीवर रविवारी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

 

मंचर प्रतिनिधी

वडगावपीर (ता. आंबेगाव) येथील गुळवे वस्तीवर श्री गणपती व श्री शंभो महादेव मंदिराच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्याचे आयोजन रविवार (दि. १३) करण्यात आले आहे. यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

रविवारी सकाळी ८.३० ते ११ वाजेपर्यंत पुण्याहवाचन, मातृका पूजन व होमहवन, तर सकाळी ११ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशारोहण व यज्ञ पूर्णाहुती होणार आहे.
सायंकाळी ६ ते रात्री ८.३० वाजेपर्यंत लाखेवाडी (ता. शिरूर) येथील श्री हनुमान भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच सायंकाळी ६ वाजल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या धार्मिक सोहळ्यास माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या