spot_img
spot_img
spot_img

निरगुडसर विद्यालयाच्या क्रिकेट संघाची तालुकास्तरावर बाजी १४ वर्षांखालील मुलांच्या संघाला प्रथम क्रमांक; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी

 

मंचर प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने लांडेवाडी येथील क्रीडा स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सन २०२६-२७ तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १४ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट संघाने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.
या उल्लेखनीय विजयाची माहिती विद्यालयाचे प्राचार्य कांताराम टाव्हरे यांनी दिली.

या विजयामुळे विद्यालयाच्या क्रिकेट संघाची जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली असल्याचे पर्यवेक्षक संतोष वळसे यांनी सांगितले.

विजयी संघातील खेळाडूंना क्रीडा शिक्षक भरत खिलारी तसेच विद्यालयातील इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक कामगिरी करत तालुकास्तरावर विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.
या यशाबद्दल विजयी खेळाडू तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक भरत खिलारी व इतर शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड. प्रदीप वळसे पाटील, सचिव प्रकाश तापकीर, संचालक व प्राचार्य सुनील वळसे पाटील, सर्व संचालक, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व पालकांनी अभिनंदन केले असून, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाला शुभेच्छा दिल्या.

Related Articles

ताज्या बातम्या