spot_img
spot_img
spot_img

कारगिल विजय दिनानिमित्त वडगावपीर येथे प्रभात फेरी, वृक्षारोपण व सैनिकांना राखी संकलन उपक्रम

मंचर प्रतिनिधी 

वडगावपीर (ता. आंबेगाव) : कारगिल विजय दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगावपीर, प्रगती विद्यालय वडगावपीर तसेच माजी सैनिक योद्धा सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने विविध देशभक्तीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यावेळी माजी सैनिक व शालेय विद्यार्थ्यांनी उत्साहात प्रभात फेरी काढून कारगिल विजय दिनाच्या घोषणा देत परिसर देशभक्तीमय केला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक भगवंत टाव्हरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सैनिक योद्धा सेवाभावी संस्था, महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष कॅप्टन साहेबराव तलवंडीकर होते.
यावेळी संस्थेचे सचिव बाळासाहेब नवले, कार्याध्यक्ष व कारगिल योद्धा रामदास पालेकर, बापूसाहेब निलक, डी. पी. कान्हुरकर, तुळशीराम आदक, अण्णासाहेब पोखरकर, गोरक्ष आदक पाटील, रमेश रोकडे, बळवंत राजगुडे, छाया गुळवे, सुवर्णा राजगुडे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील अनेक माजी सैनिक, वीर नारी, वीर माता-पिता, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कारगिल युद्धातील आपल्या अनुभवांबाबत बाळासाहेब नवले, दीपक पायगुडे व तुकाराम डफळ या माजी सैनिकांनी मनोगत व्यक्त केले. तसेच कारगिल योद्धा व पंचायत समिती आंबेगावचे माजी गटशिक्षणाधिकारी रामदास पालेकर यांनी कारगिल युद्धातील घटनांचा सविस्तर आढावा घेत विद्यार्थ्यांना देशसेवेची प्रेरणा दिली.

या प्रसंगी सीमेवरील जवानांसाठी राखी संकलन, वृक्षारोपण तसेच विद्यार्थ्यांना भारतीय सैन्यात भरतीy होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन भालेराव मॅडम, संतोष रोकडे, वाळुंज मॅडम, पोखरकर मॅडम आणि साळवे मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन गणेश गावडे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन माजी सैनिक नवनाथ डोके यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या