मंचर प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी व प्रत्येक विद्यार्थ्याला स्टेज निर्माण मिळवून देण्यासाठी माजी विद्यार्थी संघटना खडकवाडी (ता.आंबेगाव ) येथे भव्य वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
शिवजयंती निमित्त गावातून मिरवणूक काढण्यात आली. शिव व्याख्यात्या तनुजा पडवळ यांनी शिवव्याख्यान सादर केले.त्यानंतर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावर्षी शाळास्तरीय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला अंगणवाडी, प्राथमिक शाळा खडकवाडी, माध्यमिक शाळा खडकवाडी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. जवळपास ६५ विद्यार्थ्यांनी या वकृत्व स्पर्धेत आपला सहभागी नोंदवला.ही स्पर्धा चार गटांमध्ये घेण्यात आली सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि गिफ्ट देण्यात आले तसेच प्रत्येक गटातून प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना ट्रॉफी प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आले.या स्पर्धेचा निकाल अंगणवाडी गट-प्रथम क्रमांक काव्य गुलाब धुमाळ, द्वितीय क्रमांक गार्गी मच्छिंद्र धुमाळ, तृतीय क्रमांक राजवर्धन शिंदे.
गट एक ते चार -प्रथम क्रमांक स्वराज आप्पासाहेब शिंदे, द्वितीय क्रमांक सोनम संपत सुक्रे, तृतीय क्रमांक स्वराली शेखर सुक्रे,
गट पाच ते सात-प्रथम क्रमांक स्वरूपा आप्पासाहेब शिंदे, द्वितीय क्रमांक गौरी गोरक्षनाथ भोजने, तृतीय क्रमांक मधु रमाकांत गुप्ता.
गट आठ ते नऊ-प्रथम क्रमांक ज्ञानेश्वरी संतोष सुक्रे, द्वितीय क्रमांक जान्हवी लक्ष्मण सुक्रे, तृतीय क्रमांक संस्कृती गुलाब धुमाळ या सर्व स्पर्धेचे नियोजन माजी विद्यार्थी संघटनेतर्फे करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी संघ, शाळेतील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी माजी विद्यार्थी संघ घटनेने विशेष परिश्रम घेतले.





