मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील काठापुर बुद्रुक ते पोंदेवाडी रस्त्याच्या कामात ठेकेदार मनमानी करताना दिसून येत आहे काठापुर बुद्रुक ते पोंदेवाडी रस्त्यासाठी आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून साधारण पाच कोटी रुपयांचा निधी रस्त्यासाठी मंजूर झाले आहे सदर रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून गेली दोन महिन्यापासून या रस्त्याचे काम बंद असून या रस्त्यावर पाच ते सहा अपघात झाल्याचे पोंदेवाडी येथील अमोल वाळुंज यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्यात अनेक रस्त्यांची कामे सुरू असून या कामात ठेकेदार मनमानी करतात तसेच निकृष्ट काम आणि दिरंगाईमुळे आंबेगाव तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत
पोंदेवाडी काठापूर रस्त्यावर अनेक ठिकाणी संबंधित ठेकेदाराने जेसीबीच्या साह्याने रस्ता खोदला आहे तसेच रस्त्यावर खड्डे पडले असून कामही थांबवले आहेत त्यामुळे अपघात घडताना दिसत आहे रस्त्याचे काम निश्चित वेळेत पूर्ण न करता अनेक दिवस प्रलंबित ठेवले जात आहे या सर्व गोष्टींना प्रशासकीय निष्काळजीपणा दिसून येत आहे तसेच स्थानिक अधिकारी सदर रस्त्याची पहाणी करत नाही व नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत आहे
चौकट
काठापूर बु ते पोंदेवाडी रस्त्यासाठी माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाले आहेत संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांनी हे काम निश्चित वेळेत व दर्जेदार करावे नागरिकांच्या तक्रारी येणार नाही याकडे लक्ष द्यावे.
अंकिता अनिल वाळुंज – पंचायत समिती सदस्य आंबेगाव





