मंचर प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी फाटा ते शिरूर तालुक्यातील जांबुतमार्गे शिक्रापूर रस्त्याच्या कामासाठी महाराष्ट्र शासनाकडून कोट्यवधी रुपये मंजूर झाले आहेत.या मार्गावर रस्त्यावर सिमेंट कॉक्रीटचे काम सुरू आहे .
निरगुडसर पारगाव दरम्यान निरगुडसर हद्दीतील बेटवस्ती येथे चांगल्या अवस्थेत असणारा रस्ता जेसीबी यंत्राच्या साह्याने उघडून पुन्हा त्याच रस्त्यावर डांबराचे कार्पेट करण्याचे काम सुरू आहे या कामासंदर्भात आंबेगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा रस्ता रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग केलेला असल्याचे सांगितले.
या रस्त्यावर रस्ते विकास महामंडळाचे नियंत्रण असल्याचे कुंभार यांनी सांगितले. सदर रस्त्याबाबत रस्ते विकास महामंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधला असता संबंधित अधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही.
सदर रस्ता सिमेंट काँक्रीटचा होणार असताना निरगुडसर हद्दीत बेटवस्ती येथे चांगल्या स्थितीत असणारा डांबरी रस्ता संबंधित ठेकेदाराने उखडून पुन्हा त्याच रस्त्यावर डांबराचे कारपेट केल्याने नागरिकांमध्ये या रस्त्याच्या कामाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
रस्ते विकास महामंडळाकडून आपल्या मर्जीतील ठेकेदारांना करोडोंची कामे दिली असल्याने ठेकेदाराला मालामाल करण्यासाठी अधिकारी वर्ग जाणीवपूर्वक या कामाकडे दुर्लक्ष करीत आहे असा आरोप स्थानिक नागरिक करत आहे.

” अवसरी फाटा ते शिरूर तालुक्यातील जांबुत मार्गे शिक्रापूर रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करुन सिंमेट काँक्रीट रस्ता बनवण्याचे काम सुरू आहे .तर निरगुडसर हद्दीत डांबरी कार्पेट केले आहे संबंधित ठेकेदार अधिकारी यांच्याशी सदर कामासंदर्भात संपर्क साधला असता ठेकेदार अधिकारी फोन उचलत नाही
संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या विरोधात योग्य त्या न्यायालयात दाद मागणार आहे
विशाल जालींदर वाबळे ( राष्ट्रवादी युवक अध्यक्ष श.प. पक्ष आंबेगाव )





