spot_img
spot_img
spot_img

जारकरवाडी ग्रामपंचायतीत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची जयंती साजरी

मंचर प्रतिनिधी 

आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची जयंती श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी अभिवादन केले.

कार्यक्रमात बोलताना उपस्थितांनी स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव केला. महाराष्ट्राच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. ग्रामीण तसेच शहरी भागातील विकासकामांना गती देतानाच सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

प्रशासनावर त्यांची मजबूत पकड, निर्णयक्षम नेतृत्व आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे त्यांनी राज्याच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली होती.

उपस्थितांनी त्यांच्या कार्याचे स्मरण करत त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजहिताची कामे करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमास ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सरपंच प्रतिक्षा बढेकर उपसरपंच पुष्पा जारकड, सचिन टाव्हरे माजी उपसरपंच कौसल्या भोजने, सुभाष लबडे, शाम बढेकर सोसायटी चेअरमन खंडू भोजने, ग्रामपंचायत सदस्य सुरेश मंचरे, ग्रामपंचायत अधिकारी अमराळे मॅडम, सोपान पाबळे पोपट लबडे, संतोष भोजने ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते

Related Articles

ताज्या बातम्या