मंचर प्रतिनिधी
दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना स्थळावर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त बुधवार (ता. २२) रोजी वृक्षारोपणाअंतर्गत आंबा लागवड कारखान्याचे चेअरमन मा. बाळासाहेब बेंडे व संचालक मंडळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, सिताराम लोहोट, संचालिका प्रिया बाणखेले, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सुषमा शिंदे, युवक अध्यक्ष वैभव उंडे, युवती अध्यक्षा अक्षदा शिंदे, मंचर नगरपंचायतच्या सभापती माणिक गावडे, ललित थिटे, दिनेश खेडकर तसेच ऊस उत्पादक शेतकरी लक्ष्मण निकम, शिवशंकर पोहकर, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, ऊस पुरवठा अधिकारी दिनकर आदक, ऊस विकास अधिकारी सोमेश्वर दीक्षित, पर्चेस अधिकारी ब्रिजेश लोहोट, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे, वाहन प्रमुख किरण शिंदे, अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी अधिक माहिती देताना मा. बेंडे म्हणाले की अजितदादा यांचा आवडता विषय स्वच्छता व वृक्षारोपण हा होता. हा उद्देश व वाढते प्रदुषण, बदलते हवामान आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे काळाची गरज असून पर्यावरण संवर्धन व हरित परिसर निर्मितीचा संदेश देण्यासाठी कारखाना स्थळावर १० हे.आर क्षेत्रामध्ये आंबा लागवड करण्यात आले आहे. तसेच सोमवार (दि.२७ जुलै) पासून रविवार (दि.०२ ऑगस्ट) पर्यंत कार्यक्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेतीबाबत शेतकरी मेळावे आयोजित करण्यात येणार असून ऊस उत्पादक शेतक-यांनी मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन केले.





