spot_img
spot_img
spot_img

जारकरवाडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी

मंचर प्रतिनिधी 

आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी गावातील ग्रामपंचायत कार्यालय तसेच पांडुरंग मंदिर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या समाजहितकारी, लोककल्याणकारी आणि प्रेरणादायी कार्याचे स्मरण केले.

कार्यक्रमास गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या आदर्श विचारांचे अनुसरण करून समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्य पद्धतीने करण्यात आले असून जारकरवाडी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जयंती सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

Related Articles

ताज्या बातम्या