spot_img
spot_img
spot_img

अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पोंदेवाडीत १३५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व दप्तरांचे मोफत वाटप

 

मंचर प्रतिनिधी

पोंदेवाडी ( ता. आंबेगाव ) येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त पोंदेवाडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुरुवार (दि. २३) रोजी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी पोंदेवाडी येथील माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकूण १३५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व दप्तरांचे मोफत वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे  सभापती निलेश स्वामी थोरात यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी  पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, माजी उपसरपंच संदीप पोखरकर, महेंद्र पोखरकर, अमोल वाळुंज, आनंदराव पोंदे, निलेश मांजरे, अशोक दुगड, शिवराम दादा पोखरकर, अनिल गावडे सर, आप्पासाहेब इखे सर, अर्जुन महाराज वाळुंज उपस्थित होते

 

विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक शालेय साहित्य व दप्तरांचे वितरण करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी स्वागत केले.
यावेळी जिल्हा परिषद, हायस्कूल शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पोंदेवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामस्थ तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Related Articles

ताज्या बातम्या