spot_img
spot_img
spot_img

भाजपा पूर्व आंबेगाव  मंडलाची बैठक उत्साहात, नवीन कार्यकारिणीची घोषणा.

 

मंचर प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी आंबेगाव पूर्व मंडळाची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी आंबेगाव पूर्व मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.
ही बैठक भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र  चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे उत्तर मावळ जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

बैठकीच्या प्रारंभी आंबेगाव पूर्व मंडलचे  अध्यक्ष किरण बाबाजी वाळुंज यांनी प्रस्ताविक करून मंडळाच्या आगामी संघटनात्मक वाटचालीची दिशा स्पष्ट केली. त्यानंतर पुणे उत्तर मावळचे महामंत्री डॉ. ताराचंद कराळे यांनी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद यांनी कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे  काम करण्याचे आवाहन केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय भूमिका बजावावी, असे यावेळी सांगितले.

बैठकीत राहुल गव्हाणे यांनी पदवीधर मतदार नोंदणी अभियानाबाबत सविस्तर माहिती देत पात्र मतदारांची नोंदणी करण्याचे आवाहन केले.

यावेळी डॉ. ताराचंद कराळे, प्रिया पवार, प्रमोद बाणखेले, श्रीराम बांगर, संदीप आप्पा भोंडवे, अविनाश बबरे, संदीप बाणखेले, मयुर भोर, श्रीकृष्ण देशमुख, जयसिंगराव एरंडे, अरविंद बबरे, निलेश जाधव, संजय रोंधळ, सोपन वायकर, मोहनजी सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीत नवीन कार्यकारिणीची घोषणा होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करून विविध जनहिताच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल सुतार यांनी केले

Related Articles

ताज्या बातम्या