मंचर प्रतिनिधी
पुणे जिल्हा परिषदेच्या ‘मॉडेल स्कूल’ उपक्रमांतर्गत आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची निवड करण्यात आली आहे.
माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज यांच्या प्रयत्नांमधून ही निवड झाली. ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा उंचावणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या योजनेत शाळेला शहरातील खासगी इंग्रजी शाळांप्रमाणे स्मार्ट वर्ग, डिजिटल सुविधा, क्रीडांगण आणि इतर आधुनिक सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
आज जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली. यावेळी पं.स. सदस्या अंकिताताई वाळुंज सरपंच प्रतीक्षा बढेकर , सोसायटी चेअरमन खंडू भोजने, माजी उपसरपंच कौसल्या भोजने, शरद पतसंस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र काकडे, शालेय समिती अध्यक्ष किरण लबडे केंद्र प्रमुख काळे सर, मुख्यध्यापक शिवाजी चासकर सर, आनंदा भोजने, दत्तात्रय लोले व सहशिक्षक यावेळी उपस्थित होते
जारकरवाडी परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घराजवळच मिळणार असून पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.





