spot_img
spot_img
spot_img

धामणीत अक्षयतृतीयेला खंडेरायाला चंदनउटी लेपन

 

मंचर : धामणी(तालुका आंबेगांव) येथील कुलस्वामी खंडोबा मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अक्षयतृतीयेच्या मुहर्तावर रविवारी (१९ एप्रिल२६) शेकडो भाविकांनी “सदानंदाचा येळकोट,जय मल्हारच्या नामघोषात धामणी (तालुका आंबेगांव) येथील पुरातन श्री म्हाळसाकांत खंडोबाचे दर्शन घेतले.अक्षयतृतीयेच्या निमित्ताने खंडेरायाच्या स्वयंभू सप्तशिवलिंगावर सरता चैञ महिना व उगवत्या वैशाख महिण्यातील वसंत व ग्रीष्म ॠतुतील तिसरी वासंतिक चंदनउटी साकारण्यात आली

खंडोबा.म्हाळसाई व बाणाईच्या व स्वयंभू सप्तशिवलिंगावर साकारलेल्या चंदनउटीचे मनमोहक रुप पाहाण्यासाठी तसेच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. यावेळी जोडप्यांच्या हस्ते वसंत पूजा व दुग्धाभिषेक व रुद्राभिषेक संपन्न झाला.
खंडेरायाला पुरणपोळीचा व भजी कुरडईचा नैवेद्य दाखवण्यात येऊन शेकडो भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली.

वसंत ॠतुच्या उष्म्याची दाहकता कमी करण्यासाठी मंदिराच्या गाभार्‍यात व सभामंडपात झेंडू.गुलाब.अष्टरच्या फुलांची सजावट करण्यात आली मंदिराचे आवारात व सभोवताली भल्या पहाटे महिला भाविकांनी आकर्षक रांगोळ्या काढलेल्या होत्या.पहाटे मंदिरात स्वयंभू सप्तशिवलिंगाला चंदनाची उटी लेपन केल्यानंतर उपस्थित भाविकांच्या कपाळाला चंदनउटी व भंडारा लावण्यात आला.वासंतिक चंदनउटी सोहळ्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.

चैञ पौर्णिमेच्या निमित्ताने खंडोबाचे दर्शनासाठी पुणे.नगर.नाशिक मुंबई.भोसरी.पिंपरी चिंचवड जिल्ह्यातील भाविक सहकुटुंब आलेले होते.मंदिराच्या जागरण मंडपात पांच नामाची जागरणाचे घट मांडून वाघे व वीर मंडळी जागरणे करताना दिसत होती

कडक उन्हाच्या तिव्रतेमुळे दुपारनंतर भाविकांची तुरळक ये—जा सुरु होती.

अक्षयतृतीयेच्या निमित्ताने रविवारी सकाळपासून घरोघरी देवघरातील खंडोबा म्हाळसाईच्या टाकाच्या पूजेची व पुरणपोळीच्या नैवेद्याची तयारी सुरु झाल्याचे पाहावयास मिळाले यावेळी महिलांनी पहाटेपासून घरासमोर दारात सडा टाकून रांगोळ्या काढलेल्या होत्या. धामणी ग्रामस्थांनी ६६वर्षानंतर(२०२४पासून) खंडोबा देवस्थान मंदिरात चैञ व वैशाख महिण्यात उन्हाळ्यापासून थंडावा मिळावा या भावनेतून प्रथापरंपरेनुसार चंदनउटी लेपन सोहळा सुरु केला असून गुढीपाडवा.चैञ पौर्णिमा.व अक्षयतृतीया या तीन सणांच्या दिवशी चंदनउटी सोहळा खंडोबा मंदिरात होतो असे देवस्थानचे सेवेकरी दादाभाऊ भगत यांनी यावेळी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या