spot_img
spot_img
spot_img

तुकाई ऊस रोप वाटिकेचा शुभारंभ; ऊस उत्पादकांसाठी दिलासा देणारा उपक्रम

मंचर प्रतिनिधी 
निरगुडसर (ता. आंबेगाव )  येथील द. गो. वळसे पाटील कृषी फार्म, निरगुडसर येथे तुकाई ऊस रोप वाटिकेच्या शुभारंभाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील प्रमुख उपस्थित होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दर्जेदार, निरोगी आणि प्रमाणित ऊस रोपे माफक दरात उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

यावेळी बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले की, रोपांद्वारे ऊस लागवड ही पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक फायदेशीर ठरत असून यामुळे लागवड खर्चात बचत होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करून ऊस शेती अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होत आहे, ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले जात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उत्पादनवाढीसोबतच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, ऊस शेतीला नवे बळ मिळावे आणि शेतीकडे सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा, यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
या उपक्रमामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून शेतकऱ्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात येणारे असे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटी तुकाई ऊस रोप वाटिकेतील सर्व कर्मचारी वर्गाचे कार्याबद्दल कौतुक करण्यात आले तसेच या उपक्रमासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
समारंभास कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब भेंडे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील,संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, ज्ञानेश्वर अस्वारे, रामहरी पोंदे, संचालिका पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, जनरल मॅनेजर (टेक्निकल) शिरीष सुर्वे, सेक्रेटरी रामनाथ हिंगे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे,

Related Articles

ताज्या बातम्या