spot_img
spot_img
spot_img

सातगाव पठारावर बटाटा पीक जोमात

 

मंचर प्रतिनिधी 

आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागात बटाटा पीक जोमात आले आहे
चालू वर्षी पोषक वातावरणामुळे अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर बटाटा पिकाची लागवड केली आहे. भावडी, थुगाव कारेगाव पेठ पारगाव परिसरात शेतकऱ्यांनी बटाटा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे सध्या हे पीक साधारण चाळीस दिवसांचे झाले असून, पिकाची वाढही चांगली होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

एका एकर क्षेत्रात बटाटा लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात बियाणे, मजुरी, खते, औषधे व फवारणीचा खर्च येतो. बियाण्यांसाठीही मोठा खर्च करावा लागत असून, एकरी लागवड व पीक व्यवस्थापनासाठी सुमारे ४० ते ४५ हजार रुपये खर्च येत असल्याची माहिती कुरवंडी येथील शेतकरी संदीप दत्तात्रय तोत्रे यांनी दिली.

सध्या ढगाळ वातावरण असले तरी बटाटा पिकासाठी ते काही प्रमाणात पोषक ठरत आहे. मातीत बटाटे फुटण्याचा कालावधी असल्याने शेतकरी पिकाची विशेष काळजी घेत आहेत. खुरपणी तसेच खतांचा योग्य वापर करून पिकाची वाढ चांगली होण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत.

बटाट्याला बाजारभाव चांगला मिळाल्यास उत्पादन खर्चाच्या तुलनेत समाधानकारक उत्पन्न मिळू शकते, अशी अपेक्षा बटाट उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मात्र उत्पादन खर्च वाढत असल्याने बाजारभाव टिकून राहणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Related Articles

ताज्या बातम्या