spot_img
spot_img
spot_img

शिरदाळे येथे श्री हनुमान देवाचा भंडारा उत्सव उत्साहात संपन्न

 

मंचर प्रतिनिधी 

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिरदाळे (ता. आंबेगाव) येथे ग्रामदैवत श्री हनुमान देवाचा भंडारा उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

सकाळी ७ वाजता ह. भ. प. तान्हाजी महाराज तांबे यांच्या हस्ते श्री हनुमान देवाची नित्यपूजा करण्यात आली. सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत हनुमान देवाला महाभिषेक करण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली.

सायंकाळी ७.३० वाजता संपूर्ण गावासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादामध्ये पुरी, गुळवणी, कांद्याची मिरची व हिरवी मिरची असा पारंपरिक बेत ठेवण्यात आला होता. महाप्रसादाच्या तयारीसाठी गावातील महिला भगिनी व ज्येष्ठ नागरिकांनी मोलाचे योगदान दिले, तर महाप्रसाद वाटपाचे नियोजन गावातील तरुण मंडळींनी केले.

कार्यक्रमाची सांगता श्री हनुमान प्रासादिक भजनी मंडळ, शिरदाळे यांच्या भक्तिमय भजनाने झाली. या उत्सवाच्या निमित्ताने शिरदाळे गावातील ग्रामस्थांची एकजूट, धार्मिक परंपरा आणि सामाजिक बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली.

दरम्यान, अनेक दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र उत्सवाच्या दिवशी पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने शेतकरी व ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून आले.

Related Articles

ताज्या बातम्या