spot_img
spot_img
spot_img

जारकरवाडी सोसायटीची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

 

मंचर प्रतिनिधी 

जारकरवाडी ( ता . आंबेगाव ) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन खंडु गेणभाऊ भोजने यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

सभेच्या प्रारंभी संस्थेचे सचिव नवनाथ भिकन मंचरे यांनी संस्थेच्या कामकाजाचा अहवाल वाचून दाखविला. यावेळी अनेक सभासदांनी विविध प्रश्न उपस्थित करून चर्चेत सहभाग घेतला. विशेषतः कर्जमाफीच्या विषयावर सभासदांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. दरवर्षी वेळेत कर्जाची परतफेड करणारे सभासद कर्जमाफीपासून वंचित राहतात, तर कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या काही सभासदांना कर्जमाफीची रक्कम मिळण्यास सुरुवात झाल्याबद्दल सभासदांनी नाराजी व्यक्त केली.

सरकारच्या कर्जमाफी धोरणाबाबत सभासदांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला.
दरम्यान, संस्थेच्या सन २०२४-२५ या वर्षाच्या भाग भांडवलावर सभासदांच्या मागणीनुसार ११ टक्के लाभांश देण्याची घोषणा संस्थेचे चेअरमन खंडू गेणभाऊ भोजने यांनी केली.

यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र ढोबळे, माजी चेअरमन शिवाजीराव भोजने, माजी संचालक विलास लबडे, सचिन टाव्हरे, संस्थेचे व्हा. चेअरमन बाळासाहेब लबडे, संतोष कापडी, काशिनाथ ढोबळे, सुभाष भोजने, ताराबाई काकडे, यमुनाबाई कापडी, योगिता लबडे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.

संस्थेचे माजी व्हा. चेअरमन गणेश खुडे यांनी सर्व सभासदांचे आभार मानले. त्यानंतर उपस्थित सभासदांनी भोजनाचा आस्वाद घेतला.

Related Articles

ताज्या बातम्या