spot_img
spot_img
spot_img

जारकरवाडीत बिबट्याची दहशत; पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी

 

मंचर प्रतिनिधी

जारकरवाडी (ता. आंबेगाव) परिसरात बिबट्याने दहशत माजवली असून, दिवसाढवळ्या शेळीवर हल्ला करून तिला ठार केल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने या परिसरात तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शरद पतसंस्थेचे उपाध्यक्ष रविंद्र काकडे व शेतकरी सूरज लबडे यांनी केली आहे.

जारकरवाडी येथील डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यालगत लबडे मळा आहे. येथील शेतकरी सूरज लबडे यांची शेळी दि. १० ऑगस्ट रोजी दुपारी कालव्यालगत चरत असताना बिबट्याने दिवसाढवळ्या तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात शेळी ठार झाली असून, लबडे यांचे सुमारे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी शेतकरी मच्छिंद्र पिंगळे हे शेतात काम करत असताना शेजारील शेतातून बिबट्याच्या डरकाळीचा आवाज ऐकू आला. त्यामुळे घाबरलेल्या पिंगळे यांनी शेतातून तातडीने सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी, महिला व पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

बिबट्याचा वावर दिवसाढवळ्या वाढल्याने शेतकऱ्यांच्या जीवितासह पशुधनाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभागाने विलंब न करता घटनास्थळी पाहणी करून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावावा, अशी जोरदार मागणी स्थानिक शेतकऱ्यांकडून होत आहे.

Related Articles

ताज्या बातम्या