spot_img
spot_img
spot_img

पोंदेवाडीत ६५ गरजू महिलांना मोफत पीठ गिरण्यांचे वाटप विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते वितरण; अनिलभाऊ वाळुंज प्रतिष्ठानचा सहा वर्षांपासून सामाजिक उपक्रम

 

मंचर प्रतिनिधी

पोंदेवाडी (ता. आंबेगाव) : राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अनिलभाऊ वाळुंज प्रतिष्ठान, पोंदेवाडी यांच्या वतीने जारकरवाडी पंचायत समिती गणातील ६५ गरजू कुटुंबांतील महिलांना मोफत पीठ गिरण्यांचे वाटप करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते या गिरण्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित ग्रामस्थ व महिला भगिनींशी संवाद साधला.

सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पीठ गिरणी, शिलाई मशीन तसेच विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम अनिलभाऊ वाळुंज प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने केले जात आहे. या उपक्रमामुळे गरजू महिलांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होण्यास मदत होत आहे.

यावेळी बोलताना विवेक वळसे पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभाग, समाजकल्याण विभाग तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून पात्र शेतकरी, महिला आणि विद्यार्थिनींना डीबीटीद्वारे विविध वैयक्तिक लाभाच्या योजना दिल्या जात असल्याचे सांगितले. अशा योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज, आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, पारगाव गणप्रमुख मनोज रोडे पाटील, जारकरवाडी गणप्रमुख बाळशीराम वाळुंज, प्रतिष्ठानचे पदाधिकारी व आयोजक, जारकरवाडी पंचायत समिती गणातील सरपंच, पोंदेवाडी गावचे आजी-माजी सरपंच, महिला भगिनी आणि युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनिलभाऊ वाळुंज प्रतिष्ठानच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

Related Articles

ताज्या बातम्या