मंचर प्रतिनिधी
जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील वेदांत डेअरीच्या वतीने दीपावली सणानिमित्त वर्षभर डेअरीला दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना (गवळ्यांना) बोनसचे वाटप करण्यात आले. या बोनस वाटपामुळे दूध उत्पादकांची दिवाळी गोड झाली आहे.
वर्षभर नियमितपणे डेअरीला दूध पुरवठा करणाऱ्या गवळ्यांच्या योगदानाची दखल घेत वेदांत डेअरीच्या वतीने दरवर्षी दीपावलीनिमित्त बोनस देण्याची परंपरा जपली जाते. यामुळे दूध उत्पादकांना आर्थिक हातभार लागण्याबरोबरच त्यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दूध उत्पादकांच्या सहकार्यामुळेच डेअरीची प्रगती होत असून, त्यांच्या कष्टाचा सन्मान म्हणून दीपावलीनिमित्त बोनसचे वाटप करण्यात येत असल्याची माहिती वेदांत डेअरीचे चेअरमन खंडू लबडे यांनी दिली.





