spot_img
spot_img
spot_img

धामणीत सोमवतीला सदानंदाचा येळकोट

मंचर प्रतिनिधी

पुणे.नगर.नाशिक.मुंबई जिल्ह्यातील हजारो भाविकांचे कुलदैवत असणार्‍या धामणी (तालुका आंबेगांव) येथे सोमवारी (९नोव्हेंबर २६)सोमवतीच्या निमित्ताने शेकडो भाविकांनी गर्दी केलेली होती.रविवारी (८नोव्हेंबर २६)दुपारी अमावस्या प्रारंभ होऊन सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत सोमवतीचा पर्वकाळ असल्याने पहाटे पाच वाजता शिरुर.आंबेगांव.जुन्नर.खेड तालुक्यातील खंडेरायाच्या सोमवतीचे व मानाच्या काठीचे १० मानकर्‍यांच्या हस्ते स्वयंभू सप्तशिवलिंगाचा रुद्राभिषेक व दुग्धाभिषेक व आरती करण्यात आली.

यावेळी भंडारा.खोबरे व फुले उधळून सदानंदाचा येळकोट करण्यात आला.पारंपारिक वाद्याच्या गजरात व फटाक्याच्या आतषबाजीत सोमवतीच्या पालखीला सलामी देण्यात आली.सरत्या २०२६ वर्षातील शेवटची व दुसरी सोमवती आलेली असल्याने व सोमवतीचा पर्वकाळ सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत असल्याने या पर्वकाळात उत्सवमूर्तीना शाहीस्नान घालण्यासाठी व पालखीचे शाही मिरवणूक सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी अलोट गर्दी केलेली होती.

देवस्थानाचे सेवेकरांच्या हास्ते खंडेरायाची पूर्वकाळापासून करण्यात येत असलेली पारंपारिक पूजा केली.

फुलांची व भंडार्‍याची उधळण करुन पालखीच्या शाही मिरवणूकीला समस्त पंचरास मंडळीच्या हालगी.डफडे.ताशा.संबळ. सनई.शिंगाड तुतारीच्या पारंपारिक वाद्याच्या निनादात व दिमाखात सुरुवात झाली.

पालखी मिरवणूकीत भाविकांनी पिवळ्या रंगाची टोप्या परिधान केल्यामुळे त्या लक्ष वेधुन घेत होत्या.धामणीच्या पेठेत पालखीच्या मिरवणूकीत “सदानंदाचा येळकोटच्या” जयघोषात फुलांची भंडार्‍याची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

सोमवतीला येणार्‍या भाविकांसाठी ग्रामस्थांच्या वतीने भात.आमटी व बुंदीच्या महाप्रसादाची व्यवस्था केलेली होती दुपारी एक वाजेपर्यत दोन हजाराहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असल्याचे ग्रामस्थानी सांगितले.ऐन दिवाळीत सोमवतीचा सोहळा आल्याने चांगलाच रंगला असल्याचे भाविकांना पाहावयास मिळाले. यावेळी मंदिरात पांच नाम जागरण सुरू होती.

Related Articles

ताज्या बातम्या