spot_img
spot_img
spot_img

अवकाळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित; गणेशवाडी, अटकमळा व विकासवाडीतील नागरिकांचे हाल

 

 

मंचर प्रतिनिधी

चास (ता. आंबेगाव) : गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे चास परिसरातील गणेशवाडी, अटकमळा आणि विकासवाडी येथे महावितरणचे सिमेंटचे वीज खांब कोसळल्याची घटना घडली आहे.
या घटनेमुळे तिन्ही वस्त्यांवरील सुमारे शंभर ते दीडशे कुटुंबांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे परिसरातील विहिरीवरील मोटारपंप बंद पडले आहेत. परिणामी नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच शेतकऱ्यांच्या शेतीपिकांना पाणी देता येत नसल्याने शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महावितरण प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पडलेले वीज खांब बदलून लवकरात लवकर वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी गणेशवाडी, अटकमळा व विकासवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

चौकट
अवकाळी पावसामुळे गेली तीन दिवसांपासून गणेशवाडी, अटकमळा, विकासवाडी परिसरात वीज नाही त्यामुळे जनावरांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न, पिण्याचे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच या परिसरात बिबट्यांचे वास्तव्य आहे वीज नसल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे महावितरण कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहे एखादी दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार आहे महावितरण कंपनीने तात्काळ वीज उपलब्ध करून द्यावी
एकनाथ भोर स्थानिक शेतकरी

Related Articles

ताज्या बातम्या