spot_img
spot_img
spot_img

पारगावचा  संकेत अस्वारे मुंबई पोलिस दलात 

 

मंचर प्रतिनिधी 
आंबेगाव तालुक्यातील पारगाव तर्फे अवसरी येथील संकेत संतोष अस्वारे यांची मुंबई पोलिस सेवेत निवड झाली आहे. अत्यंत खडतर परिस्थितीत पाच ते सहा वर्ष खडतर परिश्रम आणि प्रशिक्षण घेऊन त्यांनी यशाला गवसणी घातली आहे.

संकेतचे वडील संतोष किसन अस्वारे हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात कर्मचारी आहेत.  नियमित सराव आणि परिश्रम करून आई वडिलांच्या कष्टाचे चीज करून दाखवले आहे.  संकेतने  मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल पारगाव परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे  पारगावचे माजी उपसरपंच सचिन दत्तात्रय अस्वारे  शालेय व्यवस्थापन समितीचे मा अध्यक्ष बजरंग देवडे,ग्राम पंचायत सदस्य शिवसेना उपतालुका प्रमुख किरण ढोबळे,राष्ट्रवादीचे माजी युवक अध्यक्ष महेश देवडे  रोहित गडकर,पंकज खुडे,आदित्य अस्वारे,राजेश गडकर,धनेश दातखिळे,जय गायकवाड यांनी संकेतचे विशेष अभिनंदन केले आहे

Related Articles

ताज्या बातम्या