spot_img
spot_img
spot_img

अवसरी खुर्द येथे हनुमान जन्मोत्सव निमित्त कार्यक्रम

 

मंचर प्रतिनिधी

“शरण शरण हनुमंता जी, तुम्हा आलो रामदूता, बजरंग बली की जय” अशा जयघोषात आंबेगाव तालुक्यात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील हनुमान मंदिरात हभप मधुकर महाराज गायकवाड (गावडेवाडी) यांचे पहाटे हनुमान जन्माचे कीर्तन झाले. तसेच आदर्शग्राम गावडेवाडी येथे हभप संतोष महाराज गावडे (गावडेवाडी) यांचे कीर्तन संपन्न झाले. अवसरी बुद्रुक येथेही हनुमान जन्मोत्सव उत्साहात पार पडला.

लोणी धामणी, खडकवाडी, वडगावपीर, पोंदेवाडी, पेठ, पारगाव, पाबळ, गावडेवाडी, अवसरी खुर्द आणि अवसरी बुद्रुक या गावांत हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

थोरांदळे येथे शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. येथे हजारो भाविकांना पुऱ्या, गुळवणी व कांद्याची चटणी असा महाप्रसाद देण्यात आला.

आंबेगाव तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये हनुमान जन्मोत्सवानिमित्त पहाटे पाच वाजता हनुमंतरायांना अभिषेक करण्यात आला. त्यानंतर भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात पार पडला.

अवसरी खुर्द येथे पहाटे पाच ते सात या वेळेत मधुकर महाराज गायकवाड (आदर्शग्राम गावडेवाडी) यांची हनुमान जन्माची कीर्तनरूपी सेवा पार पडली. या कीर्तनाला ग्रामस्थांनी भजनाची साथ दिली.

कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ अवसरी खुर्द व भैरवनाथ ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले होते.

या कीर्तनासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

Related Articles

ताज्या बातम्या