अहिल्यानगर प्रतिनिधी
निंबवी (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथील ठाणे परिवहन विभागातील निवृत्त कर्मचारी साहेबराव हौसेराम जगताप यांचे शनिवार, दि. २८ मार्च २०२६ रोजी दुःखद निधन झाले.
साहेबराव जगताप हे शांत, मनमिळावू व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनामुळे एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी मीना जगताप, मुलगी निलिमा खळे, रजनी मिरके, भाऊ बाजीराव जगताप तसेच मुलगा आकाश जगताप असा परिवार आहे.

त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता निंबवी ( ता . श्रीगोंदा जि. अ. नगर ) येथे जलदान विधी व पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
समस्त जगताप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून विविध स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.





