मंचर प्रतिनिधी
पहाडदरा ( ता. आंबेगाव ) येथील ठाकरवाडी येथे पाण्याची टंचाई भासू लागल्याने आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या वतीने टँकर सुरू झाल्याचे पंचायत समिती सदस्य अंकिता वाळुंज यांनी सांगितले
ठाकरवाडी येथे गेल्या नऊ-दहा दिवसापासून पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवू लागली होती येथील महिलांना साधारण एक किलोमीटर वरून डोक्यावर हंडे घेऊन पाणी आणावे लागत होते येथील स्थानिक ग्रामस्थांनी पाण्याबाबतची माहिती पंचायत समितीच्या सदस्या अंकिता वाळुंज यांना दिली
वाळुंज यांनी तातडीने तालुक्याचे गट विकास अधिकारी प्रमिला वाळूंज मॅडम त्यांच्याशी संपर्क साधून ग्रामस्थांच्या मागणीनुसार ठाकरवाडी येथे पाण्याचा टँकर चालू झालेला आहे स्थानिक ग्रामस्थांनी टँकर चालू झाल्यामुळे समाधान व्यक्त केले आहे





