मंचर प्रतिनिधी
धामणी ( ता. आंबेगाव ) येथे जिल्हा परिषद केंद्रशाळा धामणी येथे शनिवार ( दि. १४ ) रोजी सायंकाळी ६ ते ९ यावेळेत सांस्कृतिक मल्हार महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शालेय प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, प्रभारी तहसीलदार डॉक्टर सचिन वाघ, वन परिक्षेत्राधिकारी मंचर विकास भोसले, गट विकास अधिकारी प्रमिला वाळुंज, पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, दैनिक सामनाचे उपसंपादक विठ्ठल जाधव, वसंतराव जाधव यांच्या शुभहस्ते उद्घाटन होणारा आहे
यावेळी शाळेला सहकार्य करणाऱ्या माजी विद्यार्थी व काही मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमासाठी धामणी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आव्हान धामणी ग्रामस्थांनी केली आहे





