मंचर प्रतिनिधी
धामणी ( ता. आंबेगाव ) येथील श्री शिवाजी विद्यालय येथे माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी डॉ अशोककुमार पगारिया तर उपाध्यक्षपदी अंकुश भुमकर, भगवान वाघ यांची बिनविरोध निवड झाली आहे
रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी विद्यालय व ज्युनर कॉलेज धामणी या विद्यालयात विद्यालयाच्या स्थापनेपासून आज पर्यंतच्या सर्व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा बुधवार ( दि ४ ) रोजी आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यासाठी बहुसंख्य माजी विद्यार्थी उपस्थित होते.रयत शिक्षण संस्थेच्या ध्येय धोरणानुसार आणि शासन परिपत्रकाप्रमाणे विद्यालयात माजी विद्यार्थी संघांची स्थापना करण्यात आली. या संघाच्या माध्यमातून शाळेच्या भौतिक सोयी सुविधा करणे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे.तसेच विद्यालयात विविध शैक्षणिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
यावेळी खजिनदार माजी संदीप निवृत्ती बोराडे तर माजी विद्यार्थी सदस्य म्हणून
ज्ञानेश्वर नानाभाऊ विधाटे,
रामदास म्हतारबा जाधव,
रेश्माताई अजित बोऱ्हाडे,
आदिनाथ माधवराव जाधव विलासजी नेनसुख पगारीया, शांताराम गेणभाऊ जाधव,
डॉ.राजेंद्र नामदेव वाकचौरे,
देवानंद दत्तात्रय जाधव,
श्रीराम बळवंत विधाटे,
दादाभाऊ मारुती गाढवे,
बाबासाहेब शिवराम बढेकर,
मयूर संभाजी सरडे,
वामनराव धोंडीबा जाधव,
दत्तात्रय धोंडीबा भोजणे
सचिव-मा.श्री प्राचार्य सोमवंशी एम.ई.
कार्यकारणीतील सर्व सदस्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक या सन्मानित केले.
तसेच कार्यकारिणीची निवड करण्यात माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमात माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ.अशोककुमार पगारीया यांनी मार्गदर्शन केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सोमवंशी सर यांनी या संघांचा उद्देश सांगितला.उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर विधाटे यांनी आभार मानले.





