spot_img
spot_img
spot_img

बदलत्या हावामानाचा डाळिंब पिकाला फटका

 

मंचर प्रतिनिधी 
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बदलत्या हवामानाचा डाळिंब पिकाला फटका बसत आहे
फळधारणा समाधानकारक नसल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे
डाळिंब पिकाला लागवड तंत्रज्ञान, नवीन रोगराई, प्रतिकूल हवामान आणि वाढलेला खर्च यामुळे मोठी उलथापालथ झाली आहे. दरवर्षी खर्च आणि भाव वाढत असले, तरी लागवड क्षेत्र व उत्पादन सातत्याने घटत चालले आहे.

डाळिंब हे अवर्षणप्रवण भागातील काटेरी फळझाड, कमी पाण्यातही समाधानकारक उत्पादन देत असल्याने दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना डाळिंब पिक वरदान ठरत आहे परंतु बदलत्या हवामानामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला आर्थिक तोटा सहन लागत आहे

डाळिंबाला वर्षभर मागणी असून, गुणवत्तेनुसार १०० ते २०० रुपये प्रतिकिलो दर मिळतो. एकरी आठ ते दहा लाखांपर्यंत उत्पादनक्षमतेची शक्यता असली, तरी औषधे, खते आणि मजुरी दर दुपटीपेक्षा अधिक वाढले. खर्चात झालेल्या वाढीमुळे ६५ टक्के शेतकरी अयशस्वी ठरत असून, केवळ ३५ टक्के शेतकरीच यशस्वी ठरत आहेत.

डाळिंब पिका समोरील नवीन आव्हाने

वाढलेला पाऊस आणि आर्द्रता

निमॅटोड व मररोग नियंत्रणाबाहेर

रिमझिम पावसामुळे फलधारणेत अडथळे

उन्हाचा अभाव, सतत ढगाळ वातावरण

॥ कळीकूज, फळकूज आणि मूळकूज रोगांचा प्रसार

दर आणि खर्च वाढला; उत्पादन मात्र घटले

नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब

॥ मातीबेडवर लागवड, सिंगल-खोड तंत्र

फलधारणेसाठी मधमाशी पेट्यांचा पूर्ण वापर ॥ आच्छादनाद्वारे ऊन व रोगांपासून संरक्षण

रासायनिकांचा मर्यादित वापर; जैविक व सेंद्रिय

खतांच्या वापरात वाढ

ट्रॅक्टरद्वारे फवारणी

हवामान यंत्रणा, सीसीटीव्ही व झटका यंत्रणा

तज्ज्ञ कार्यशाळा आणि प्रशिक्षण

स्लरीचा नियंत्रित वापर

हवामान बदलांमुळे अनेकांनी डाळिंब बागा काढून टाकले आहेत डाळिंब पिकासाठी आर्थिक भांडवल मोठे आहे वातावरणाचा व बाजार भावाचा मेळ बसल्यास उत्पन्नात वाढ होऊन डाळिंब उत्पादक शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे पैसेही मिळतात

अशोक धानापुणे डाळींब उत्पादक शेतकरी जारकरवाडी, ता. आंबेगाव जिल्हा पुणे

Related Articles

ताज्या बातम्या