मंचर प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील हिंदू आणि मुस्लिम भाविकांच्या ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या वडगावपीर (ता. आंबेगाव ) येथील श्री पीरसाहेब-हजरत दावल मलिक पीर दर्गा शरीफ यात्रेनिमित्त राज्यभरातून आलेल्या हिंदू-मुस्लिम बांधवांनी दर्शानासाठी आणि नवसाच्या दंडवतासाठी मोठी गर्दी केली होती.
यात्रेच्या पहिल्या दिवशी बुधवार (दि. ११) संदलचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पड़ला.दुसऱ्या दिवशी गुरूवार (दि.१२) भाविकांचे दंडवत व शेरणी वाटप करण्यात आले. अनेक हिंदू, मुस्लिम भाविकांनी नवसाच्या फुलांची चादर तसेच मलिदा व गोडभाताच्या नैवेद्याची, शेरणी (गूळ) वाजतगाजत मिरवणूक काढून भक्तिभावाने दर्यात अर्पण केली. या यात्रा उत्सवासाठी मोठ्या संख्येने मुस्लिम भाविक आले होते. समस्त ग्रामस्थ वडगावपीर, मांदळेवाडी व मुजावर जमात व सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते यांनी यात्रेची व्यवस्था पाहिली. पारगाव पोलिस ठाण्याच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.अशी माहिती ट्रस्टच्या वतीने हनिफ मूजावर यांनी सांगितले.





