spot_img
spot_img
spot_img

पोंदेवाडी काठापूर रस्त्याचे काम सुरू –  संघर्षनामा इम्पॅक्ट

मंचर प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी काठापूर रस्त्याचे काम साधारण दोन महिन्यांपासून बंद होते  संघर्षनामा न्युज पोर्टलने पोंदेवाडी काठापूर रस्त्याच्या कामात ठेकेदाराची मनमानी प्रशासनाचे दुर्लक्ष या मथळ्याखाली बातमी दि. ( ८ ) रोजी प्रसिद्ध केली होती 
संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी सदर बातमीची दखल घेत पोंदेवाडी काठापूर रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.
माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून कामाला सुरुवात केली होती, अनेक ठिकाणी जेसीबी यंत्राच्या साह्याने रस्ता उखडला होता परंतु मध्येच काम बंद केल्याने नागरिकांची दळणवळणासाठी अडचण निर्माण झाली होती. पोंदेवाडी काठापूर रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी  संघर्षनामा  न्युज पोर्टलचे आभार  मानले

पोंदेवाडी काठापूर रस्त्याचे काम सुरू झाले असून संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी वेळेत काम पूर्ण करावे
नागरिकांना दळणवळणासाठी अडचण येऊ देऊ नये
अंकिता वाळुंज – पंचायत समिती सदस्य आंबेगाव.

Related Articles

ताज्या बातम्या