मंचर प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा शब्द खरा ठरणार का? महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे डोळे लागले आहेत. लाडकी बहीण योजनेचा दिलेला शब्द सरकारने खरा केल्याने कर्जमाफी ही होणार अशी शेतकऱ्यांना आशा वाटू लागू लागली आहे
राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा लागली आहे. वाढलेल्या कीटकनाशके खतांच्या किमती, इंधन, मजुरीचे दर वाढल्याने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. शेतमालाला मिळणारा भाव व उत्पादन खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी सांगत आहे. एकीकडे आधुनिक भांडवली शेती करण्याच्या
नादात शेतकरी खर्च करत आहेत तर दुसरीकडे शेती विषयक लागणाऱ्या साधन सामग्रीवर लादलेला जीएसटी कर यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शासनाने कोणतीही अट न घालता चालू व थकित कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकरी करत आहे
कारण मागील सरकारच्या काळामध्ये पूर्वीपासून कर्ज भरत आलेला शेतकरी हा तसाच राहिला होता. त्या सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर 50 हजार रुपये अनुदान जाहीर केले होते. परंतु, मोजक्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला होता. त्यामुळे सरसकट कर्जमाफीची मागणी सध्या जोर धरू लागले आहे.
प्रत्येक शेतमालाला हमीभाव द्यावा
शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतमालाला हमीभाव सरकारने द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. फळबागा भाजीपाला याच्यासाठी लागणारा भरमसाठ खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. परंतु बाजार भाव गडगडल्यानंतर त्याचा भांडवली खर्च देखील निघत नाही. परिणामी शेतकऱ्याच्या अंगावर कर्जाचा डोंगर उभा राहत आहे.
१) चौकट
” शेतकऱ्यांच्या मनामध्ये शेतीविषयक नकारात्मकता व उदासीनता तयार झाली आहे. सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी तरच शेतकरी वर्ग टिकेल.
शिवाजी टाके संचालक विकास सोसायटी – शिंगवे
२) चौकट
शासनाने ३०/९/२०२५ पर्यंत थकीत कर्जदारांची माहिती मागवली आहे तसेच ३१/३/२०२५ पर्यंत चालू बाकीची माहिती मागवली आहे तशी माहिती आपण शासनाला कळवली आहे शासनाकडून अधिकृत कर्जमाफीची घोषणा झालेली नाही पिक कर्ज उचलणाऱ्या शेतकऱ्यांनी 31 मार्च पूर्वी नियमित पिक कर्ज भरावे.
खंडू भोजने चेअरमन – जारकरवाडी विकास सोसायटी





