
लोणी धामणी ( प्राध्यापक अरुण गोरडे )
मनुष्याला सर्व सोंगे आणता येतात! परंतु परमार्थ आणि पैशाचे सोंग आणता येत नाही असे प्रतिपादन ह.भ.प.लक्ष्मण महाराज नागरे यांनी लोणी (ता.आंबेगाव ) येथे केले. लोणी या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त आयोजीत केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या किर्तन रूपी सेवेत नागरे महाराज बोलत होते.
नागरे महाराजांनी या वेळेस परमार्थ कसा करावा व तो कशा प्रकारचा असावा परमार्थतून प्राप्ती व समाजाने संतांच्या विचाराचे अनुकरण करावे व समाधान व पुण्याची प्राप्ती करावी असे सांगितले. यावेळी टाळकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.भाविकाची संख्या लक्षणिय होती.महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होता.काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते.
अडीच ते तीन हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.ग्रामस्थांनी अचूक नियोजन, शिस्तबद्धता याचे एक अनोखे दर्शन यावेळी घडले.कीर्तनास येणाऱ्या सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.नऊ दिवस चाललेला किर्तन सोहळ्याचा आजच्या कार्यक्रमाने समारोप झाला.या कार्यक्रमांचे नियोजन समस्थ ग्रामस्थ लोणी ग्रामस्थांनी केले होते.





