spot_img
spot_img
spot_img

शिरदाळे येथील पंचांग वाचण्याची शेकडो वर्षांची परंपरा कायम

 

मंचर प्रतिनिधी 

शिरदाळे (ता.आंबेगाव ) येथे गेली शेकडो वर्षांपासून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अर्थात मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी पंचांग वाचन केले जाते.ही गेली शेकडो वर्षांची परंपरा असून संपूर्ण वर्षभराचे नियोजन शेतकरी या आधारावर करत असतात.यात चालू वर्षाचे पर्जन्यमान,हवामान याचा अंदाज वर्तवला जातो.
सकाळी गुढी उभारल्यानंतर गावातील ग्रामस्थ शिरदाळे महादेव मंदिर परिसरात जमतात.त्याठिकाणी पंचांगाचे पूजन केले जाते.

वर्षफल (भविष्यफल):- यात देशाची स्थिती,पर्जन्यमान,आरोग्यविषयक अंदाज,राजकीय परिस्थिती यावर भाष्य केलेले असते.तसेच वर्षभरातील सण,वार सुवर्ण खरेदीचे मुहूर्त,साडेतीन मुहूर्त कधी आहेत याचे देखील वाचन केले जाते.
नवीन वर्षाच्या पूर्वसंधेला गावातील अनेक ग्रामस्थ,जेष्ठ मंडळी,तरुण मंडळी हे संवत्सर फल आवर्जून ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यातून शेतकरी बांधवांना संपूर्ण पावसाचा अंदाज दिला जातो.तसेच ते आपल्या शेतीचे नियोजन देखील याच आधारावर करत असतात.त्यामुळे ग्रामीण भागात या परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे.शेवटच्या टप्प्यात सर्वांना ज्वारीचे दाणे वाटप केले जातात

ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला पाऊस कमी असून उत्तरार्धात मात्र त्याची भरपाई होईल असे पंचांग वाचक श्री.संजय तांबे यांनी सांगितले आहे.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या