spot_img
spot_img
spot_img

लोणी येथे आरोग्य शिबीर संपन्न

 

मंचर प्रतिनिधी

लोणी ( ता. आंबेगाव ) येथे
अनुगामी लोकराज्य अभियान (अनुलोम) व ग्रामपंचायत लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने व डॉ.डी. वाय.पाटील आयुर्वेद हॉस्पिटल आणि समर्थ फाउंडेशन पुणे यांच्या सौजन्याने (दि.१८ ) रोजी महादेव मंदिर लोणी येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिरीष भालेकर (अनुलोम पुणे विभाग प्रमुख)यांनी अनुलोम संस्थेची माहिती व कार्यपद्धती याबाबत माहिती देऊन या आरोग्य शिबीरास शुभेच्छा दिल्या.

या शिबिरास लोणीचे सरपंच सावळेराम नाईक,सौ.कविता हिंगे (सचिव महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा भाजपा), श्री.सुरेश भुजबळ(अनुलोम शिरूर उपविभाग प्रमुख),श्री.किरण वाळुंज (भाजप पूर्व मंडल अध्यक्ष),सौ.अनिता डफळ(शिरूर उपविभाग संवादिनी),राजेंद्र वाळुंज(उपसरपंच लोणी),डॉ.मीरा खलते (मेडिकल ऑफिसर प्रा.आ.केंद्र.धामणी),डॉ.भास्कर भोसले , डॉ.चंद्रकांत देशमुख ,
श्री.सुधीर सोनार,गटप्रवर्तक शीतल काकडे,आरोग्य सेवक पांचाळ हे मान्यवर उपस्थित होते.

यामध्ये एकूण १८९ जणांची तपासणी करण्यात आली होती.यामध्ये ६८ जणांना मोफत डोळे तपासणी करून त्यांना चष्मे देण्यात आले. तसेच २१ जणांचे मोतीबिंदू ऑपरेशन डी. वाय पाटील येथे येत्या सोमवारी मोफत होणार आहे व १० जणांचे (किडीस्टोन,फिशर)याचे ऑपरेशन मोफत होणार आहे.

बीपी,शुगर,ब्रेस्ट कॅन्सर,तोंडाचा कॅन्सर, सीबीसी,हिमोग्लोबिन, रक्त गट इ.तपासणी करण्यात आल्या. या शिबिराच्या व्यवस्था अमोल ढगे(अनुलोम मित्र),गोरक्ष भोजने,विजय आदक,अमित क्षीरसागर, गोरक्ष भोजने , सारिका रोडे, मोहिनी बांगर यांनी पाहिली. सुत्रसंचलन सचिन तागड ( अनुलोम भागजनसेवक आंबेगाव )
आभार हर्षल सुतार यांनी मानले

Related Articles

ताज्या बातम्या