spot_img
spot_img
spot_img

१४ वर्षांचा वाद अखेर मिटला! देवगाव गावातील शेतरस्त्याचा प्रश्न पोलिसांच्या मध्यस्थीने मार्गी; शेतकऱ्यांनी मानले स.पो नि. सचिन कांडगे यांचे आभार

 

मंचर प्रतिनिधी

आंबेगाव तालुक्यातील देवगाव येथील गेल्या १४ ते १५ वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतरस्त्याचा वाद अखेर मार्गी लागला असून पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या पुढाकाराने आणि मध्यस्थीने हा प्रश्न सोडविण्यात यश आले आहे.

देवगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये रस्त्याच्या वापरावरून अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. हा वाद मिटविण्यासाठी महसूल विभागासह विविध शासकीय अधिकाऱ्यांनी यापूर्वी प्रयत्न केले होते. मात्र कोणताही तोडगा निघाला नव्हता. काही दिवसांपूर्वी पुन्हा दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्यानंतर प्रकरण पारगाव (कारखाना) पोलीस ठाण्यात पोहोचले.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी संबंधित गावातील प्रमुख व्यक्ती व शेतकऱ्यांची दोन वेळा बैठक घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सर्व बाजू समजून घेतल्या.
तसेच रस्त्यांबाबतचे कायदेशीर पैलू आणि उपलब्ध पर्याय यांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली.

सर्व संबंधितांची मते ऐकून घेतल्यानंतर शेतरस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात आला.

यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न सुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत त्यांचे आभार मानले.

Related Articles

ताज्या बातम्या