spot_img
spot_img
spot_img

अन्न , औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा ग्रामीण भागात वाढता दबदबा

 

मंचर प्रतिनिधी
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यभरातील अन्न भेसळ विरोधातील कारवायांना मोठी गती मिळाली असून त्यांच्या धडक कार्य शैलीमुळे ग्रामीण भागातही त्यांचा दबदबा निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

ग्रामीण भागातील अनेक छोटे-मोठे व्यावसायिक अन्न सुरक्षा परवाना न घेता व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी होत्या. तसेच विविध खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. मात्र, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासन विभागाने अशा गैरप्रकारांवर कठोर कारवाई सुरू केली आहे.

राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात दूध, दही, पनीर आणि इतर खाद्यपदार्थांमधील भेसळीविरोधात विभागाने धडक मोहिमा राबवत अनेक ठिकाणी छापेमारी केली. भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात आल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

विशेषतः बेसन व इतर खाद्यपदार्थांच्या व्यवसायात भेसळ करणाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा धसका घेतल्याची चर्चा आहे. अन्न भेसळीला लगाम घालण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने होत असलेल्या कारवायांमुळे ग्राहकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

तुकाराम मुंढे यांच्या कठोर आणि पारदर्शक कार्यपद्धतीचे ग्रामीण भागातून स्वागत होत असून, जनहितासाठी अशाच धाडसी व खमक्या अधिकाऱ्यांची इतर विभागांमध्येही आवश्यकता असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Related Articles

ताज्या बातम्या