spot_img
spot_img
spot_img

जारकरवाडी येथे ‘आनंद अनुभूती शिबिराचे’ आयोजन आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचा उपक्रम; सुदर्शन क्रिया, योग व ध्यानाचे प्रशिक्षण

 

मंचर प्रतिनिधी :

आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने जारकरवाडी येथे “आनंद अनुभूती शिबिर” आयोजित करण्यात आले असून या शिबिरामध्ये सहभागी नागरिकांना योग, प्राणायाम, ध्यान आणि जगप्रसिद्ध सुदर्शन क्रिया शिकविण्यात येणार आहे. मानसिक तणावमुक्त जीवन, उत्तम आरोग्य आणि सकारात्मक जीवनशैलीसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

सुदर्शन क्रिया ही श्वासावर आधारित प्रभावी पद्धत असून ती 100 पेक्षा अधिक आजारांवर सकारात्मक परिणाम करणारी मानली जाते. या शिबिरात सहभागी होणाऱ्यांना दैनंदिन जीवनातील तणाव कमी करण्याचे तंत्र, मनःशांती मिळविण्याचे मार्ग तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जाणार आहे.
अनुभवी प्रशिक्षक रचना दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर पार पडणार असून 23 जून ते 28 जून या कालावधीत दररोज सायंकाळी  7  ते  9  या वेळेत कार्यक्रम होणार आहे.

शिबिराचे आयोजन श्री संत ज्ञानेश्वर मंदिर (धामणी खिंड), जारकरवाडी येथे करण्यात आले आहे. परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी 9975950823, 9730569148 किंवा 9209375334 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Related Articles

ताज्या बातम्या