spot_img
spot_img
spot_img

पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता अध्यक्षपदी दौंडचे वीरधवल जगदाळे, तर उपाध्यक्षपदी आंबेगावचे विवेक वळसे पाटील यांची निवड

 

मंचर प्रतिनिधी

पुणे जिल्हा परिषदेच्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी दौंडचे वीरधवल बाबा जगदाळे, तर उपाध्यक्षपदी आंबेगावचे विवेक वळसे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ही नावे जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

दौंड तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी वीरधवल जगदाळे पाटील यांचे नाव चर्चेत होते. त्यांच्या अनुभवाची आणि जनसंपर्काची दखल पक्षाने घेत त्यांच्याकडे जिल्ह्याची धुरा सोपवली आहे. ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असलेला चेहरा म्हणून वीरधवल जगदाळे पाटील यांच्या निवडीकडे पाहिले जात आहे.

 

दुसरीकडे, आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे विवेक वळसे पाटील यांची दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. वळसे पाटील यांच्या रूपाने आंबेगावला जिल्ह्याच्या सत्तेत महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. प्रशासकीय कामाचा दांडगा अनुभव आणि तरुणांमध्ये असलेली पकड यामुळे त्यांची निवड सार्थ ठरल्याचे बोलले जात आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यालयात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत फटाके फोडत आनंद व्यक्त केला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या