spot_img
spot_img
spot_img

आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ पुणे जिल्ह्यात नवीन केंद्रांच्या वितरणासाठी ११ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार

 

पुणे प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यात नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्र’ वितरित करण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे (सर्वसाधारण शाखे)ने सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.

नवीन आपले सरकार सेवा केंद्र वितरित करण्याबाबतचा जाहिरनामा यापूर्वी दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानुसार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२६ होती. मात्र, आता अर्ज सादर करण्यासाठी दि. ७ सप्टेंबर ते ११ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या मुदतवाढीच्या कालावधीत नवीन आपले सरकार सेवा केंद्रासाठी प्राप्त होणाऱ्या अर्जांची विहित पद्धतीने स्वीकृती करून त्याची पोहोच देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच प्राप्त अर्जांचा दैनंदिन अहवाल सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत संबंधित कार्यालयास सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

त्यामुळे पुणे जिल्ह्यात नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यास इच्छुक असलेल्या पात्र अर्जदारांना या मुदतवाढीचा लाभ घेता येणार आहे. संबंधितांनी विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या