मंचर प्रतिनिधी
नेरळ, रायगड : अँटी करप्शन बोर्ड (ट्रस्ट) यांच्या वतीने नेरळ, रायगड येथे रविवारी (३० ऑगस्ट) आयोजित करण्यात आलेल्या ३ऱ्या महाराष्ट्र राज्यस्तरीय अधिवेशनात सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील नारोडी येथील डॉ. सुरेश रामचंद्र घोलप यांचा मानद डॉक्टरेट पदवीने सन्मान करण्यात आला.
सुरेश घोलप हे आंबेगाव तालुका रेशनिंग / केरोसीन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष आहे या अधिवेशनात सामाजिक कार्य, समाजसेवा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. सुरेश रामचंद्र घोलप यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल मानद डॉक्टरेटचे प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व गौरवपत्र प्रदान करण्यात आले.
सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणे, जनतेच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविणे तसेच समाजहिताच्या विविध विषयांवर सातत्याने लेखणीच्या माध्यमातून काम केल्याबद्दल हा सन्मान देण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.





