मंचर प्रतिनिधी
पोंदेवाडी (ता. आंबेगाव) : येथे कृषी विभागाच्या वतीने पोंदेवाडी येथील शेतकरी बचत गटाला संकरित हायब्रीड बाजरीच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले. पंचायत समिती सदस्या अंकिता अनिल वाळुंज यांच्या हस्ते हा वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी कृषी सेवक श्री. गवई हे प्रमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमास परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
नुकताच आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात समाधानकारक पाऊस झाल्याने बाजरी पिकाच्या पेरणीस पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वितरित करण्यात आलेल्या संकरित हायब्रीड बाजरी बियाण्यांची वेळेत पेरणी होऊन चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना सुधारित शेती पद्धती, वेळेवर पेरणी आणि पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेऊन आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
सदर काय कार्यक्रम प्रसंगी ख. वि. संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, माजी उपसरपंच संदीप पोखरकर, अमोल वाळुंज, अर्जुन महाराज वाळुंज, आनंदा पोंदे, चंद्रकांत विरकर, राहुल घोलप, स्वामी घोलप, मंगल जाधव, पुष्पा लंके आदी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते





