मंचर प्रतिनिधी
धामणी(तालुका आंबेगांव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा मंदिरात स्वयंभू सप्तशिवलिंगाचा व खंडोबा.म्हाळसाई.व बाणाईच्या सर्वांगसुंदर मुखवट्यांचा वासंतिक अष्टगंधउटी व फळ महोत्सव शुक्रवार(१मे ) रोजी उत्साहात साजरा झाला.
वैशाख पौर्णिमा व बुध्द पौर्णिमेनिमित्त पारंपारिक अष्टगंधउटी सोहळ्यासाठी झेंडू.अष्टर.गुलाब.मोगरा आणि शुध्द अष्टगंधाचा वापर करण्यात आला. वाढत्या उन्हापासून देवाला थंडावा मिळावा,या भावनेतून स्वयंभू सप्तशिवलिंगाला व मुखवट्यांना अष्टगंधाचा लेप लावून गाभार्यात सुगंधी फुलांची व फळांची आरास करण्यात आली होती. यामुळे अवघे मंदिर परिसर भक्तिने आणि सुगंधाने न्हाऊन निघाले होते.
होते.बुध्द पौर्णिमेच्या मुहर्तावर शुक्रवारी (१मे२६) शेकडो भाविकांनी “सदानंदाचा येळकोट,जय मल्हारच्या नामघोषात धामणी (तालुका आंबेगांव) येथील पुरातन श्री म्हाळसाकांत खंडोबाचे दर्शन घेतले वैशाख पौर्णिमेच्या निमित्ताने खंडेरायाच्या स्वयंभू सप्तशिवलिंगावर सरत्या चैञ व वैशाख महिण्यातील वसंत व ग्रीष्म ॠतुतील चौथी वासंतिक अष्टगंधउटी साकारण्यात आली.
खंडोबा.म्हाळसाई व बाणाईच्या व स्वयंभू सप्तशिवलिंगावर साकारलेल्या अष्टगंधटीचे मनमोहक रुप पाहाण्यासाठी तसेच दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.तत्पूर्वी धामणीच्या पुरातन खंडोबा मंदिरात पहाटे चार वाजता घंटानाद झाला.
अकरा जोडप्यांच्या हस्ते वसंत पूजा व दुग्धाभिषेक व रुद्राभिषेक संपन्न झाला.खंडेराय म्हाळसाई बाणाई व जोगेश्वरीच्या देखण्या मूर्तीना वस्रालंकार व सुंगधी फुलांचे हार घालण्यात आल्यानंतर देवस्थानाचे सेवेकरी प्रभाकर भगत.दादाभाऊ भगत.सुभाष तांबे.शांताराम भगत.नामदेव भगत.पांडुरंग भगत.धोंडीबा भगत.अनिरुध्द वाळूंज. बाळशिराम साळगट यांच्याकडून स्वयंभू सप्तशिवलिंग आणि पंचधातूच्या सर्वांगसुंदर देखण्या खंडोबा.म्हाळसाई व बाणाईच्या मुखवट्यावर सुवासिक केशर व सुंगधी दवण्याचे अत्तरमिश्रित अष्टगंध उटीचा लेप देण्यात आला.त्यानंतर खंडेरायाला नैवेद्य दाखवण्यात येऊन शेकडो भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली.
नवविवाहीत जोडपी कुटुंबियासह आलेले दिसत होते.मंदिराच्या जागरण मंडपात पांच नामाची जागरणाचे घट मांडून वाघे व वीर मंडळी जागरणे करताना दिसत होती .





