मंचर प्रतिनिधी
लोणी (ता.आंबेगाव ) येथे नागपंचमी निमित्त गावात यंदा, महाराष्ट्रातील भव्य कलगीतुरा सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार (दि.१७ ) सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत श्री छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन, बाजारतळ येथे होणार आहे. कार्यक्रमाचे हे ३४ वे वर्ष असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धवराव लक्ष्मण लंके करणार असून पंचरास मंडळी, लोणी यांच्या गणाने कार्यक्रमाचा प्रारंभ होईल.या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील,. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम,भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
या सामन्यात रेडिओस्टार शाहीर तुरेवाले साहेबराव पवार (किन्हई करंडी) आणि कलगीवाले शाहीर तान्हाजी माळवदकर (गुंळुचवाडी, बेल्हे) हे कलगी-तुरा सादर करणार आहेत.कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे सभापती कैलासबुवा काळे, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, बाजार समिती सभापती निलेश थोरात, युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव वैभव उंडे, पंचायत समिती सदस्य अंकिता वाळुंज, कैलास गायकवाड (सचिव महसूल विभाग महाराष्ट्र राज्य ), सरपंच सावळाभाऊ नाईक, तहसिलदार राहुल सारंग, पोलीस निरीक्षक पारगाव- शिंगवे सचिन कांडगे, उद्योजक वसंत पडवळ, कैलास सिनलकर -व्यवस्थापक ठाणे जनता सहकारी बँक, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी सिनलकर यांच्यासह तालुक्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत
सर्व कलगी-तुरा रसिकांना समस्त ग्रामस्थ व कलगी-तुरा मंडळ, लोणी यांच्या वतीने सहर्ष आमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये शाहीर कैलासवासी रामदास गुंड यांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.





