मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यात पुनर्वसन विभागाच्या संपादित जमिनींवर दलालांचा (एजंट) डोळा असून, एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळ्या गावांत जमिनीचे दुबार वाटप पोंदेवाडी लाखणगाव मध्ये होत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत या गंभीर घोटाळ्याची सखोल चौकशी करून, महसूल विभागाने यात लक्ष घालावे आणि भ्रष्ट एजंट व अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आंबेगाव तालुका ख. वि. संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी केली आहे
एकाच प्रकल्पबाधित किंवा पात्र व्यक्तीला नियमांचे उल्लंघन करून दोन वेगवेगळ्या गावांमध्ये जमिनीचे वाटप होत असल्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय होत असून, दलाल यातून आर्थिक फायदा लाटत आहेत
सदर जमीनीमध्ये दलालांचा हस्तक्षेप वाढला असून
जमीन वाटपाची प्रक्रिया पूर्ण होऊन अधिकृत ‘फेरफार’ होण्याआधीच, काही एजंट व दलाल परस्पर जमिनीची खरेदी-विक्री करत आहेत. कागदपत्रांमधील त्रुटी आणि हिशोबातील गोंधळाचा गैरफायदा घेऊन बनावट कागदपत्रे तयार केली जात आहे
महसूल व पुनर्वसन विभागाने तात्काळ या प्रकरणाची दखल घ्यावीव संबंधित दोषींवर कारवाई करावी
जिल्हा पुनर्वसन कार्यालय आणि त्याशी संबंधित विभागांच्या दप्तरांची (रेकॉर्ड) चौकशी करण्यात यावी तसेच
चुकीच्या पद्धतीने वाटप झालेल्या जमिनींचे फेरफार रद्द करून, दोषींवर कायदेशीर कारवाई करावी
अशी मागणी अनिल वाळुंज यांनी महसूल व पुनर्वसन विभागाकडे केली आहे.





