मंचर प्रतिनिधी
आंबेगाव तालुक्यातील लोणी सोसायटीच्या चेअरमनपदी रुक्मिणी वाळुंज तर व्हाईस चेअरमनपदी तान्हाजी वाळुंज यांची बिनविरोध निवड झाली आली.
मावळते चेअरमन ज्योती जगन लंके व व्हाईस चेअरमन खंडू भिवा माकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागांवर ही निवड प्रक्रिया पार पडली.
निवडीनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच राजेंद्र गायकवाड, माजी चेअरमन शरद वाळुंज, दीपक वाळुंज, उद्योजक महेंद्र वाळुंज, जयेश वाळुंज, राजू वाळुंज, बाबाजी वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे परिसरातून अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या निवडीमुळे सोसायटीच्या विकासकामांना अधिक गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.





