spot_img
spot_img
spot_img

शिरदाळेच्या तळ्याच्या पाणी पातळीत लक्षणीय घट

मंचर प्रतिनिधी 

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथील गाव तळ्याच्या पाणी पातळीत लक्षणीय घट झाली आहे.सुरू असलेला कडक उन्हाळा,वातावरणातील बदल यामुळे यावर्षी पाणी पातळी चांगलीच घटली आहे.गेल्यावर्षी मे महिन्याच्या मध्यावर पावसाने सुरवात केली होती.यंदा मात्र पाऊस लांबणीवर गेल्याचे पाहायला मिळत आहे.शेतकरी देखील पावसाची आतुरतेने वाट पाहत असून सुरवातीचा वळवाचा मान्सून पूर्व पाऊस झाल्यास शेतीच्या कामांना चांगलं वेग येईल परंतु अजून तरी अशी शक्यता दिसत नाही.

१९७२ च्या दुष्काळात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तळ्याचे खोलीकरण करण्यात आहे.त्यानंतर २००७-०८ साली भीमाशंकर सहकारी साखर कारखाना यांच्या माध्यमातून पुन्हा खोलीकरण करण्यात आले.त्यामुळे पाणी साठा वाढला असून तेव्हापासून आजपर्यंत हे तळे कधीच आटले नाही.गावातील शेतकऱ्यांची जनावरे पाणी पिण्यासाठी याचा वापर करतात.तर महिला मंडळी कपडे धुण्यासाठी देखील याचा वापर करतात.

तळ्यात सात ते आठ फुटांपर्यंत मासे
या तळ्यात अनेक प्रजातीचे मासे आहेत.त्यामुळे पाणी स्वच्छ राहण्यास मदत होते.तर काही मासे हे हे सात ते आठ फुटांपर्यंत असल्याचे अनेक ग्रामस्थांनी पाहिलेले आहे.
या गावची निर्मितीच या पाणवठ्याच्या आधारावर झाली असावी असा अंदाज जुनी मंडळी सांगतात.हे तळे म्हणजे शिरदाळे गावासाठी एक जीवन वाहिनी असून त्याच्या आधारावर गावात लोकवस्ती टिकून आहे.

चौकट
हे गाव तळे म्हणजे आमच्या गावच्या लोकांची जलवाहिनी आहे.या पाण्याच्या वापराचे देखील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून योग्य नियोजन केलेले आहे.त्यामुळे प्रत्येक घरापर्यंत हे पाणी पोहचवता येते.शिवाय गेली दहा वर्षांपासून गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हेच पाणी शुद्ध करून पिण्यासाठी दिले जाते.त्यामुळे याच पाण्याच्या जीवावर आमचे गाव या डोंगरावर टिकून आहे.या तळ्याचे संवर्धन करणे ग्रामस्थांचे देखील कर्तव्य आहे.
श्री.मयुर सरडे (मा.उपसरपंच शिरदाळे)

Related Articles

ताज्या बातम्या