spot_img
spot_img
spot_img

धामणीत आरोग्य शिबीर संपन्न

मंचर प्रतिनिधी 

धामणी ( ता. आंबेगाव ) येथे
ब्रिटानिया कंपनी, यांच्या सीएसआर उपक्रम अंतर्गत सर नेस वाडिया फाउंडेशन व शिवशंकर डेअरी धामणी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने धामणी येथे आरोग्य शिबीर संपन्न झाले.यावेळी धामणी,शिरदाळे,पहाडदरा गावातील रुग्णांनी लाभ घेतला.या आरोग्य शिबिरात प्राथमिक तपासणी,दंत तपासणी,डोळे तपासणी,बीपी तपासणी,हिमोग्लोबिन, लहान मुले, गर्भवती महिला, किशोरवयीन मुली, पुरूष यांची मोफत तपासणी करून मोफत औषध वाटप करण्यात आले.सरनेस वाडीया फाउंडेशन यांच्या माध्यमातून मॅनेजर श्री.केदार अन्नम,श्री.प्रणव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण तपासणी शिबीर संपन्न केले.

यावेळी धामणी ग्रामपंचायत सदस्य प्रतीक जाधव, उद्योजक संदीप बोऱ्हाडे, शिरदाळे माजी सरपंच मयूर सरडे, देविदास करंजखेले,आशिष गाढवे, पांडूरंग जाधव,भाऊसाहेब करंडे,अक्षय रोडे विविध संस्थांचे पदाधिकारी धामणी ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

Related Articles

ताज्या बातम्या