
मंचर प्रतिनिधी
जारकरवाडी ( ता. आंबेगाव ) येथील ग्रामपंचायत कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली.
ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच सुभाष लबडे, सचिन टाव्हरे, कौसल्या भोजने, ग्रामपंचायत सदस्य सुरेश मंचरे, श्रावण काकडे, संतोष भोजने, संदीप वैद्य, मयुर भोजने, बाळु वणवे, विजय पवार व ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते
उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम व आदर्श शासनव्यवस्थेची आठवण करून देत त्यांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. शेवटी सर्वांनी एकजुटीने समाजात ऐक्य, स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेम वाढवण्याचा संकल्प केला.





